Advertisements
Advertisements
प्रश्न
संक्षिप्त टिपा लिहा.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
टिप्पणी लिखिए
उत्तर
- ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० रोजी झाली. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.
- जहाजे पूर्वेकडील देशात पाठवणे, तेथे माल विकून जो पैसा मिळेल त्यातून आणि पाठवलेल्या रोख रकमेतून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे, ते इंग्लंडमध्ये विकणे व नफा मिळवणे हे कंपनीच्या कामाचे सुरुवातीचे स्वरूप होते.
- या काळातील जहाजे शिडांवर चालणारी असल्यामुळे त्यांना वर्षाच्या ठरावीक काळात निघणे आणि ठरावीक वेळी परतणे अपरिहार्य होते. यामुळे माल खरेदी करणे आणि विकणे जिकीरीचे होऊ लागले. भाव कमी असताना खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी जागा मिळवणे आवश्यक झाले
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?