Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
मामू हा कष्टमय जीवन जगणारा एक सामान्य माणूस होता, मात्र त्याचे मन संवेदनशील होते. एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम पन्हाळगडावर होता. मामूला पन्हाळ्यावर हजेरी लावावी लागली. त्या काळात सामान्य माणसाला वाहतुकीची कोणतीच साधने उपलब्ध नव्हती. पन्हाळ्यावर जायचे म्हणजे दगडधोंड्यांतून, काट्याकुट्यांतून, जंगलातून वाट काढत जायचे होते. बरे, महाराजांच्या सेवेसाठी जायचे असल्यामुळे रमत-गमत जाणे शक्यच नव्हते. अशा या खडतर वाटेने चौदा मैलांची पायपीट केल्यावर त्याचे शरीर दमले होते. पण त्याची याबद्दल जराही तक्रार नव्हती. त्याचे मन मात्र ताजे, टवटवीत होते. तो निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत तिथे पोहोचला होता. आताही इतक्या वर्षांनंतर त्या प्रसंगाची आठवण काढताना त्याच्या तोंडून उद्गार येतात, "फाटेचं धुक्यातलं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचे." मामाची ही संवेदनशीलता होय.
दुसरा प्रसंग म्हणजे मामूच्या मुलाच्या लग्नाचा प्रसंग. मामच्या चतुरस व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याचे अनेकांशी आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. म्हणून या लग्नाला समाजातील अनेक मोठमोठी माणसे आली होती. आमदार, खासदार, बडे व्यापारी, शिक्षक-प्राध्यापक असे वेगवेगळ्या थरांतले लोक आत्मीयतेने जमले होते. ते पाहून त्याचे मन भरून आले. आपल्यासारख्या सामान्य, गरीब माणसाविषयी लोकांना खूप आत्मीयता आहे, हे पाहून त्याचा कंठ दाटून आला. सर्वांचे आभार मानताना त्याच्या कंठातून शब्दच फुटेनात. कसेबसे आभार मानून त्याने माईक खाली ठेवला. या दोन्ही प्रसंगांतून मामूच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोण ते लिहा.
चैतन्याचे छोटे कोंब:
कोण ते लिहा.
सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:
कोण ते लिहा.
शाळेबाहेरचा बहुरूपी:
कोण ते लिहा.
अनघड, कोवळे कंठ :
कृती करा.
लेखकाने विदयार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह :
कृती करा.
मामुची शाळाबाह्य रूपे :
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ___________
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. ___________
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ - ___________
खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.
माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. - ______
खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू एखादया कार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. - ____________
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
थोराड घंटा
स्वमत.
'शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्वमत.
मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा.
अभिव्यक्ती
'मामू' या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
अभिव्यक्ती
'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.