Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
‘मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?...’ या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.
उत्तर
उत्तररात्रीचे दृश्य खरोखरच विलक्षण असते. सर्वत्र, सर्व काही शांतनिवांत असते. दिवसा इकडेतिकडे सतत धावणारी, कोणती ना कोणती कामे करीत राहणारी, एकमेकांशी बोलणारी, एकमेकांशी भांडणारी, एकमेकांवर प्रेम करणारी ही माणसे निवांत झोपलेली असतात. काहीजण दिवसा चिंतांनी ग्रासलेली असतात. काहीजण मिळालेल्या यशामुळे आनंदाच्या, सुखाच्या शिखरावर असतात. या सर्व भावभावना, सर्व सुखदु:खे उत्तररात्रीच्या क्षणांमध्ये विरून गेलेल्या असतात. दुष्ट विचार, दुष्ट भावना आणि चांगल्या माणसांच्या मनातले चांगले विचार, चांगल्या भावना हे सर्व काही त्या क्षणी दूर निघून गेलेले असते. माणसे भांडतात तेव्हाचे त्यांचे भाव आठवून पाहा. सर्व त्वेष, द्वेष, राग, संताप उफाळून आलेला असतो. तीच माणसे उत्तररात्री या सर्व भावभावनांचे गाठोडे बाजूला ठेवून निवांत झालेली असतात. सज्जन व दुर्जन दोघेही शेजारी शेजारी झोपलेले असतील, तर त्यांच्यातला चांगला कोण व वाईट कोण हे नुसते पाहून ठरवताच येणार नाही. त्या क्षणी सर्वांचे मन निर्मळ, शुद्ध झालेले असते.
सर्व प्राणिमात्रांमध्ये, वनस्पतींमध्ये हाच शुद्ध भाव वसत असतो. आणि हा शुद्ध भाव अनादी काळापासून सर्वांच्या मनात वस्ती करून आहे. माणसाचे मन या मूळ भावनेकडेच धाव घेत असते. आदिम खूप खूप पूर्वीचे. ऋजू म्हणजे साधे, सरळ, निर्मळ, पारदर्शी. त्यात कोणतेही किल्मिष, वाईट भावनेचा लवलेशही नसतो. सगळ्यांच्याच ठायी हा भाव असल्याने सर्वजण एकमेकांशी हसतखेळत बोलू शकतात. एकमेकांच्या मदतीला धावतात. एकमेकांवर प्रेम करतात. त्या शुद्ध, निर्मळ भावनेने एकमेकांशी बांधले जातात. लेखकांना या वाक्यातून हेच सांगायचे आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
उत्तररात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये
कृती करा.
घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये
कृती करा.
चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये
कृती करा.
उत्तररात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रशन
कारणे शोधा व लिहा.
मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण...
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
जॅक्रांडा -
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
चाफा -
वर्णन करा.
उत्तररात्रीचे आगमन
वर्णन करा.
पहाट व पाखरे यांच्यातील नात
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
वृक्ष-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
फुले-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
वेली-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
पाखरे-
स्वमत.
‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
अभिव्यक्ती.
डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे (२)
(य) ______
(र) ______
(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव (२)
(य) ______
(र) ______
सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत ‘काय लिहावं?’ याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो, त्या वेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. ‘पहाट झालीय काय?’ असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’ पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये! पहाट कशी होते, हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली नजाकत जाणवेल. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅक्रांडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो. |
(३) स्वमत अभिव्यक्ति: (४)
पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
‘तुम्ही अनुभवलेली पहाट’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.