Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
तरफ या पाठातील भलामोठा दगड हलवण्याच्या प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
एका भल्यामोठ्या दगडाजवळ सारे लोक गोळा झाले होते. गोंधळ-गडबड चालली होती. छोट्या आर्कीचे लक्ष तिथे गेले. त्याने पाहिले की, लोक पहारी व शिगा यांच्या मदतीने दगड हटवण्याचा प्रयत्न करीत होते; पण दगड काही केल्या जागचा हलत नव्हता. आर्कीला इतके दिवस त्याच्या डोक्यात असलेली कल्पना उमजली. त्याने तरफ तयार करायचे ठरवले. त्याने एक लांबलचक लाकडाचा ओंडका तयार केला. तो दगडाखाली खोल खुपसला. त्या ओंडक्याखाली त्याने लाकडाची एक गंडेरी टेकू म्हणून ठेवली व दुसऱ्या टोकाशी लोकांना शक्ती लावायला सांगितली आणि तो प्रचंड दगड सरकला. खड्ड्याबाहेर आला. आर्कीची कल्पना प्रत्यक्षात आली.
shaalaa.com
तरफ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?