Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत:
‘वान नदीले कदीमधी येनारा पूर आता पटावरल्या आकळ्याइले आला व्हता.’ यातून तुम्हांला समजणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर
या विधानाचा शब्दशः अर्थ आधी आपण समजून घेऊ. वान नदीला पूर्वी भरपूर पाणी असे. पूर्वी ती भरभरून वाहत होती. अधूनमधून पूरही येई. या नदीच्या पाण्यात जशी वाढ होई, तशी वाढ आता शाळेच्या पटसंख्येत होऊ लागली होती. म्हणजे गुरुजींचे कष्ट फळाला आले होते. ज्या गावात पूर्वी शाळाच नव्हती, त्या गावात आता शाळा आली. इतकेच नव्हे, तर चौथीपर्यंत असलेली शाळा गुरुजींच्या प्रयत्नांमुळे सातवीपर्यंत झाली. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातच मिळावे; म्हणून गुरुजींनी गावात हायस्कूल सुरू करण्याचाही प्रयत्न केला. पण उचापती लोकांनी हायस्कूल होऊ दिले नाही. पण नदीला जसा पूर येई, तसा गावातल्या शाळेच्या विद्यार्थी संख्येला पूर येऊ लागला होता. हे मात्र एक सुचिन्ह होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चौकटी पूर्ण करा.
लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत - ____________
चौकटी पूर्ण करा.
गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे - ____________
चौकटी पूर्ण करा.
गावाचे भरभरून कौतुक पाहणारी - ____________
खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि परबतराव
खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि संपती
खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि पाटील
कृती करा.
गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी
कृती करा.
बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये
कारणे लिहा.
शिक्षण आटोपल्यावर बापूना गावाची ओढ लागली; कारण
कारणे लिहा.
गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते; कारण
थोडक्यात उत्तरे लिहा.
'पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं', असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
बोर्डींगमधला 'संपती' नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा.
गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.
'गढी’, ‘वान नदी’ आणि ‘वटवृक्ष’ या तीन प्रतीकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे, ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.
‘गढी’ पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या.
या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.
‘गढी’ कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
गावाच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा.