हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते?

ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही चार मार्ग लिहा.

विस्तार में उत्तर

उत्तर

  1. हास्यमंडळ: दररोज सकाळी सार्वजनिक उद्यानांमध्ये एकत्र येऊन मोठ्याने हसल्याने तणाव कमी होतो. यामुळे आपल्याला मानसिक आरोग्य सुधारल्यासारखे वाटते.
  2. सुसंवाद: मित्र-मैत्रिणी, समवयस्क, भाऊ-बहिणी, शिक्षक व पालक या सर्वाशी सुसंवाद साधणे म्हणजेच आपले मन मोकळे करणे याने ताणतणाव कमी होतो. मित्र, भाऊ-बहिण, शिक्षक, पालक किंवा आपल्या वयाच्या लोकांसोबत आपल्या आनंद आणि दु:ख, मन मोकळे करणे याने तणाव कमी होतो.
  3. लेखन: आपल्या विचारांना शब्दरूप देऊन लिहिणे आणि नकारात्मक विचारांचे विश्लेषण करणे हा तणाव कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरतो.
  4. छंद जोपासणे: वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य इत्यादी छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही आणि रिकामा वेळदेखील सत्कारणी लागतो. सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळवावे. त्यामुळे नकारात्मक भावना कमी होतात.
  5. संगीत: संगीत शिकणे, ऐकणे, गाणी म्हणणे यांमुळे आनंद मिळून ताण हलका होतो. संगीतात मनःस्थिती बदलण्याची ताकद असते.
  6. मैदानी खेळ व व्यायाम: मानसिक आणि शारीरिक आरोग्य मैदानी खेळांमुळे सुधारते. खेळांमुळे शारीरिक व्यायाम, शिस्त, सामाजिक संवाद, एकजुटीची भावना वाढणे, आणि सामाजिक कौशल्ये विकसित होतात, तसेच तणावही दूर होतो. योगासुद्धा या उपक्रमांचा एक भाग असावा.
  7. निसर्ग निरीक्षण: निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण, पाळीव प्राण्याचे संगोपन यानेही ताण कमी होतो.
shaalaa.com
ताणतणाव व्यवस्थापन (Stress Management)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: सामाजिक आरोग्य - स्वाध्याय [पृष्ठ १०८]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 9 सामाजिक आरोग्य
स्वाध्याय | Q 4 | पृष्ठ १०८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×