Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
उत्तर
कलिंगच्या राजाला कोबी पाठवण्यासाठी अप्पाजींनी एका बैलगाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरण्यास सांगितले. ही बैलगाडी कलिंग राज्याकडे रवाना केली गेली. गाडीवान प्रवासामध्ये रोज कोबीच्या रोपांना पाणी घालत होता. कलिंग राज्यात बैलगाडीने पोहोचेपर्यंत तीन महिने लागत. या तीन महिन्यांत कोबी तयार होऊन कलिंगच्या राजाला ती तयार ताजी कोबी मिळाली. अशा प्रकारे, अप्पाजींच्या चतुराईमुळे ताजी कोबी कलिंग देशाकडे पाठवली गेली.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
चिकाटी -
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
खालील शब्द वाचा. समजून घ्या.
गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग |
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?