Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
मराठा चित्रशैली
टिप्पणी लिखिए
उत्तर १
मराठा चित्रकला शैली:
- ही शैली इ.स. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित होऊ लागली.
- या शैलीत रंगीत चित्रांचा समावेश असतो.
- ही शैली भित्तिचित्रे (भिंतीवरील चित्रे) आणि हस्तलिखितांमध्ये वापरली जाणारी लघुचित्रे या स्वरूपात आढळते.
- भित्तिचित्रे प्रामुख्याने जुन्या वाड्यांमध्ये, मंदिरे, छतांवर इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात.
- मराठा शैलीवर राजपूत आणि युरोपीय चित्रकला शैलींचा प्रभाव आहे.
shaalaa.com
उत्तर २
इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली.
- सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो.
- या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत.
- वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात.
- या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
shaalaa.com
कला म्हणजे काय ?
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?