Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
रेशीम उद्योग
उत्तर
रेशीम उत्पादनासाठी, रेशीम किडे (पतंग) विशेषत: ‘बॉम्बिक्स मोरी’ प्रजातीच्या किड्यांचे पालन केले जाते. या किड्यांचा विकास चार टप्प्यांमध्ये होतो: अंडी, अळी, कोश, आणि पतंग. मादी किड्याद्वारे टाकलेल्या हजारो अंड्यांना कृत्रिम पद्धतीने उबवून त्यांच्या उबवणीचा काळ कमी केली जाते. या अंड्यांमधून निघालेल्या अळ्यांना तुतीच्या झाडांवर सोडण्यात येते. अळ्यांचे पोषण तुतीच्या पानांद्वारे होते. जेव्हा ते सुमारे 3-4 आठवडे पाने खातात, त्यानंतर ते तुतीच्या फांदीकडे जातात. अळ्यांच्या लाळग्रंथीमधून निघणारा स्राव हा रेशमी तंतू निर्माण करतो. अळ्या या तंतूचा वापर करून स्वत:भोवती गुंफून करून एक रेशीमकोष तयार करतात, जो सामान्यत: दंडगोलाकार किंवा गोलाकार स्वरूपाचा असतो.
कोषाचे पतंगात रूपांतर होण्याच्या दहा दिवसांपूर्वीच सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात. या उकळत्या पाण्याच्या परिणामाने कोषातील अळी मरतात आणि रेशीमचे तंतू मुलायम होतात. या तंतूंना सोडवून त्यांचे प्रक्रियांतर्गत रूपांतरण करून रेशीम धागा तयार केला जातो. या रेशीम धाग्यांपासून विविध प्रकारची वस्त्रे बनविली जातात.