Advertisements
Advertisements
प्रश्न
टिप लिहा.
शीतयुद्ध
टिप्पणी लिखिए
उत्तर
(१) दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्रे व साम्यवादी राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभावासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला, त्या संघर्षाला 'शीतयुद्ध' असे म्हणतात.
(२) वॉल्टर लिपमन या स्तंभलेखकाने या संघर्षाला सर्वप्रथम 'कोल्ड वॉर' (शीतयुद्ध) हा शब्दप्रयोग वापरला.
(३) दोन राष्ट्रगटांत तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. परस्परांतील अविश्वासातून प्रत्येक राष्ट्रगट आक्रमक राजनीती करू लागला. अमेरिका व सोव्हिएट रशिया हे या गटांचे नेतृत्व करीत होते.
(४) प्रत्यक्ष युद्धाचा अभाव; मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजे 'शीतयुद्ध' होय. दुसऱ्या महायुद्धानंतर १९९१ पर्यंत ही शीतयुद्धाची परिस्थिती जगात होती.
shaalaa.com
शीतयुद्ध व्याख्या
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?