Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप
उत्तर
आपत्ती टाळणे (आपत्तीपूर्व व्यवस्थापन) तसेच आपत्ती आल्यास आपत्तीला तोंड देणे (आपत्ती/आघातानंतरचे व्यवस्थापन) या दोन बाबी आपत्ती व्यवस्थापनात येतात. या संपूर्ण कामात आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार केला जातो आणि त्यावर अनुसरून कृती आराखडा तयार करतात. अशा सर्व कार्यांचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन विभाग व केंद्रे करतात. आपत्कालीन नियोजन चक्राप्रमाणे पूर्वतयारी, विमोचन, सज्जता, प्रतिसाद, पुनरुत्थापन आणि पूर्ववतता अशा टप्प्यात आपत्तीशी सामना केला जातो. आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती यांचा विचार करून त्याप्रमाणे त्वरित निर्णय घेऊन आपत्ती व्यवस्थापन केले जाते. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आणीबाणीची अवस्था, संक्रमणावस्था आणि पुनर्निर्माण अवस्था अशा तीन टप्यांनी आपत्तीला तोंड दिले जाते.