Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
उपयोजित इतिहास
टिप्पणी लिखिए
उत्तर
- 'उपयोजित इतिहास' या संज्ञेकरता 'जनांसाठी इतिहास' (पब्लिक हिस्टरी) हा पर्यायी शब्द वापरला जात असून यात इतिहासाद्वारे मिळणाऱ्या भूतकाळातील घटनांसंबंधित ज्ञानाचा उपयोग वर्तमान व भविष्यकाळात करण्याचा विचार केला जातो.
- वर्तमानकाळातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय यांकरता भूतकाळातील घटनांचे विश्लेषण करण्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते.
- उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये केवळ तज्ज्ञांचाच नव्हे, तर सर्वसामान्यांचाही सहभाग पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन या प्रकल्पांच्या माध्यमांतून करून घेता येऊ शकतो.
- तसेच, या क्षेत्रासंबंधित संग्रहालये व अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन व संपर्कमाध्यमे यांसारख्या क्षेत्रात इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते.
- या प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरता इतिहासकार, स्थापत्यविशारद, अभियंता, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ज्ञ व छायाचित्रणतज्ज्ञ इत्यादी, विशेष कौशल्यधारक मनुष्यबळाची आवश्यकता असते. यामुळे, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
shaalaa.com
उपयोजित इतिहास म्हणजे काय ?
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.3: उपयोजित इतिहास - संक्षिप्त उत्तरे १