Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत लिहा.
पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत.
लघु उत्तरीय
उत्तर
शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतूनच जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोहोचवण्यास तयार नव्हते. स्वामींकडे पैसे नव्हते. कोणालाही असे वाटेल की, स्वामींकडे पाहून नावाड्यांनी पैसे न घेता स्वामींना पोहोचवायला हवे होते. परंतु नावाडी मोठेपण ओळखत नव्हते. तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोहोचवणे हा त्या नावाड्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे नावाड्यांनी नकार दिला. तसेच, स्वामींचे मोठेपण दिसून आल्यावर त्यांना पश्चात्तापही झाला. यामुळे नावाड्यांनी नकार दिला, यात मला चूक दिसत नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?