Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
उत्तर
सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जायचे असेल, तर मी लवकर उठते. पटपट स्वत:ची तयारी करून आईला मदत करते. बरेच वेळा आईबाबा मला जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर नेतात. मी व माझी लहान बहीण वाळूचे किल्ले बांधतो. वाळूत पडलेले वेगवेगळ्या आकाराचे शंख-शिंपले गोळा करतो. शहाळ्याचे गोड पाणी आणि ओली भेळ खात खात वाळुत बसून गप्पागोष्टी करतो. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांत पाय भिजवताना, पाण्यात उड्या मारताना खूपच मजा येते.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
कसब -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
मजबूत -
खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू. |
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?