Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण.
उत्तर
एकच माणूस एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी कशी करू शकतो, याचे सर्व जगाला थक्क करून सोडणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लिओनार्दो दा व्हिंची हे होय. ते एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिततज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, तंत्रज्ञ, तत्त्वज्ञ असे सर्व काही होते. त्यांनी इमारती बांधल्या. पूल बांधले. यंत्रे निर्माण केली. अनेक यंत्रांचे आराखडे तयार केले. अनेक शोध लावले. प्रकाशविज्ञान, खगोलविज्ञान, आवाजविज्ञान, मेकॅनिक्स, शस्त्रविज्ञान, शरीरविज्ञान अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी उत्तुंग संशोधन करून ठेवले आहे. हे सर्व त्यांनी आपल्या नोंदवह्यांमध्ये लिहून ठेवले आहे. त्यांचा हा ज्ञानाचा खजिना म्हणजे मानवजातीवर फार मोठे ऋण आहे.