Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा.
कृष्णदेवराय
संक्षेप में उत्तर
उत्तर
- इ. स. १५०९ मध्ये, कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीवर बसले.
- त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला.
- बहमनी सुलतान महमूदशाहच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्यांनी पराभव केला.
- त्यांच्या कारकिर्दीत, विजयनगरचे राज्य पूर्वेला कटक, पश्चिमेला गोवा, उत्तरेला रायचूर दोआब आणि दक्षिणेला हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते.
- ते एक विद्वान होते आणि त्यांनी 'आमुक्तमाल्यदा' हा राजनीतीविषयक तेलुगु ग्रंथ लिहिला.
- त्यांनी विजयनगरमध्ये हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिर बांधले.
- त्यांचा मृत्यू इ.स. १५३० मध्ये झाला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?