Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्याजवळची झोपडपट्टी, पाडा, वाडी -वस्ती, तांडा, फिरत्या लोकांची पालं यांपैकी शक्य त्या ठिकाणास शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत भेट द्या. तेथील लोकांचे जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी बोला. त्या भेटीतील लोकांचे जीवन आणि पाठातील लेखिकेचे अनुभव यांची तुलना करून भेटीचा अहवाल लिहा. तो वर्गात वाचून दाखवा. तुम्हांला अशा लोकांसाठी काही करता येईल का ते गटात मित्रांशी चर्चा करून ठरवा.
उत्तर
तारीख - ०६ फेब्रुवारी २०२५
स्थळ - जळगाव
विषय - फिरत्या लोकांच्या जीवनाविषयी माहिती.
या ठिकाणी मी माझ्या कुटुंबासोबत गेली होती. फिरत्या लोकांच्या वैयक्तिक जीवना विषयी माहिती घेताना असे लक्षात आले आहे की त्यांचे जीवन हे खूप खडतर असते. जीवन जगत असताना त्यांना होणारा त्रास हा आपल्याला ऐकायला ही त्रास होतो. सर्व सुविधांपासून वंचित जिवन त्यांना जगावे लागते. चांगला काम धंदा मिळत नाही. पाल्याच्या शिक्षणाची सोय नसते. एवढेच काय तर कधी कधी तर उदरनिर्वाह ही शक्य होत नाही. त्यांची स्थिती ऐकताना आमच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रु आले होते.
कार्यवृत्त लिहणाऱ्याची सही
अ.ब.क.