Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
मागील वर्षीच्या सुट्टीत आम्ही सहकुटुंब आजोळी गेलो होतो. आजोबांनी आम्हांला गव्हाचे शेत पाहायला नेले. अनेक एकर क्षेत्रावर पसरलेल्या त्या हिरव्यागार शेताच्या एका बाजूला कोवळ्या पिकाचे गालिचे पसरलेले होते, तर दुसरीकडे गव्हाच्या लोंब्यांनी भरलेली रोपे डौलात उभी होती. गव्हाच्या बाजूला एक-एक ओळ धणे लावलेले दिसते. गव्हाच्या वाढीसाठी आवश्यक नायट्रोजन मिळावा यासाठी धणे लावल्याचे आजोबांनी सांगितले. अधून-मधून पाणी शिंपणाऱ्या बारीक बारीक नळ्या गेलेल्या दिसत होत्या. सायंकाळ होत आल्याने शेतात काम करणारे लोक घरी परतत होते. त्यांच्यासोबत त्या हिरवळीचा आस्वाद घेत आम्हीही परतलो.
shaalaa.com
पद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?