Advertisements
Advertisements
प्रश्न
उपयोग लिहा.
किरणोत्सारी पदार्थ
दीर्घउत्तर
उत्तर
- औद्योगिक क्षेत्र:
- रेडिओग्राफी: बिडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे वितळजोड यातील भेगा, पोकळी गॅमा किरणांच्या साहाय्याने शोधता येतात. यासाठी कोबाल्ट-60, इरिडिअम- 192 यांसारख्या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेरामध्येकेला जातो. धातुकामातील दोष शाेधण्यासाठी हे तंत्र वापरतात.
- जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे: ॲल्युमिनिअम, प्लॅस्टिक लोखंड अशा पदार्थांचे कमी-अधिक जाडीच्या पत्र्यांचे उत्पादन करताना हवी तेवढी जाडी कायम राखणे आवश्यक असते. उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सार मापन यंत्र असते. मापन यंत्राने दाखविलेला किरणोत्सार पत्र्याच्या जाडीप्रमाणे कमी जास्त होतो. या तंत्राच्या साहाय्यानेच पॅकिंगमधील मालही तपासता येतो.
- दीप्तिमान रंग व किरणोत्सारिदीप्ति रंग: पूर्वी घड्याळाचे काटे, विशिष्ट अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडिअम,प्रोमेथिअम, ट्रीटिअम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फर बरोबरचे मिश्रण वापरले जात होते . HID (High Intensity Discahrge) दिव्यात क्रिप्टॉन-85 तर बीटाकिरणांचा स्रोत म्हणून X-ray युनिटमध्ये प्रोमेथिअम-147 हे समस्थानिक वापरतात.
- सिरॅमिक वस्तूंमध्ये होणारा वापर: सिरॅमिकपासून बनविण्यात येणाऱ्या टाईल्स, भांडी, प्लेटस्, स्वयंपाकघरातील भांडी यामध्येचमकदार रंग वापरतात. या रंगांमध्येपूर्वी युरेनिअम ऑक्साईडचा वापर करत असत.
- कृषी क्षेत्र:
- रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुकेव गुणसूत्रे यावर किरणोत्साराचा उपयोग करून त्यात मूलभूत बदल करता येतात.
- कोबाल्ट-60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग अन्नपरिरक्षणात करतात.
- कांदे, बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यांवर कोबाल्ट - 60 च्या गॅमा किरणांचा मारा करतात.
- विविध पिकांवरील संशोधनात अनुरेखक म्हणून स्ट्रॉन्शिअम-90 वापरले जाते.
- वैद्यकशास्त्र:
- पॉलिसायथेमिआ: या रोगामध्येतांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण वाढते. यावर उपचारासाठी फॉस्फरस-32
- हाडांचा कर्करोग: उपचार करताना स्ट्रॉन्शिअम-89, स्ट्रॉन्शिअम-90, समारिअम-153 आणि रेडिअम-223
- हायपर थायरॉइडिझम: गलग्रंथी मोठी होणे, भूक लागूनही वजन कमी होणे, झोप न येणे, हे सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होते. यालाच हायपर थायरॉइडिझम म्हणतात. याच्या उपचारासाठी आयोडिन-123
- ट्यूमर ओळखणे: मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोराॅन-10, आयोडिन-131, कोबाल्ट-60 चा वापर तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक-74 चा वापर केला जातो.
shaalaa.com
किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?