Advertisements
Advertisements
प्रश्न
उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसयिक क्षेत्रे सांगा व त्या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याविषयी चर्चा करा.
उत्तर
१. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये केवळ तज्ज्ञांचाच नव्हे, तर सर्वसामान्यांचाही सहभाग पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन या प्रकल्पांच्या माध्यमांतून करून घेता येऊ शकतो.
२. तसेच, या क्षेत्रासंबंधित संग्रहालये व अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन व संपर्कमाध्यमे यांसारख्या क्षेत्रात इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते.
३. या प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरता इतिहासकार, स्थापत्यविशारद, अभियंता, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ज्ञ व छायाचित्रणतज्ज्ञ इत्यादी, विशेष कौशल्यधारक मनुष्यबळाची आवश्यकता असते. यामुळे, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अभिलेखागार
नॅशनल फिल्म आर्काइव्हची मुख्य कचेरी ______ येथे आहे.
टिपा लिहा.
इंडियन म्युझियम: कोलकाता
टिपा लिहा.
नॅशनल फिल्म अर्काइव्ह
टिपा लिहा.
उर संग्रहालय