Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
माझ्या ग्रंथाला राज्यपुरस्कार मिळला व्याख्यानमाला गाजल्या, आदर्श प्राध्यापक म्हणून माझा गौरव झाला, मला डी. लिट मिळाली, राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून माझा सन्मान झाला, 'संतसाहित्यचिंतना'सारख्या माझ्या पुस्तकाला श्रेष्ठ संतसाहित्यविषयक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला, मला परदेशाची निमंत्रणं आली, की त्या बातम्या सांगणारी जी पत्रं नि तारा माझ्या टेबलावर येऊन पडत, ती पाकिटं फोडून या बातम्या मी प्रथम कुणाला सांगत असे? काचेच्या खिडकीतून माझ्याकडे टक लावून पाहणाऱ्या मकबऱ्याला ! मग मकबऱ्याचे मिनार मिस्कीलपणे 'हसत-डोलत. त्याचा घुमट तरारून येई. माझ्या यशानं त्यालाही तेज चढे. त्याच्या स्नेहशील दृष्टीच्या वर्षावात मी अखंड न्हाऊन निघत असे. |
- आकृती पूर्ण करा: [2]
- एका शब्दांत उत्तर लिहा: [1]
लेखकाचा संतसाहित्यावरील ग्रंथ - - स्वमत: [3]
'मकबरा आणि लेखक' यांच्यातील मैत्रीचे नाते तुमच्या शब्दांत लिहा.
आकलन
उत्तर
- संतसाहित्यचिंतन
- लेखक आणि मकबरा यांच्यात एक अदृश्य मैत्रीचे नाते आहे. लेखक आपल्या प्रत्येक यशाची पहिली वाच्यता मकबऱ्याजवळ करतो, जणू तोच त्याचा जिवलग मित्र आहे. मकबऱ्याच्या मिनारांच्या प्रतिक्रिया, त्याचे मिस्कील हसणे, आणि तेजस्वी भासणे हे लेखकाच्या आनंदात सहभागी होण्याचे प्रतीक वाटते. या नात्यात एक भावनिक जिव्हाळा असून, लेखक आपल्या अनुभवांचे प्रतिबिंब मकबऱ्यात पाहतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?