Advertisements
Advertisements
प्रश्न
वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा........ आदर्शनगर, ता. १६ : दि. १५ ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय, आदर्शनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्शनगर परिसतातील महत्त्वाच्या चौकांत 'वाचनसंस्कृती वाचवा' या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. त्याचबरोबर विद्यालयात 'उत्कृष्ट वाचन' हि स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत इयत्ता सातवीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास 'उत्कृष्ट वाचन' म्हणून बक्षीस देण्यात आले. पुढील काळामध्ये वाचनसंस्कृती विकसित व्हावी, या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. |
वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो?
- बातमी कोणत्या तारखेची आहे?
- वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले?
- कोणत्या विद्यार्थ्यास 'उत्कृष्ट वाचक' म्हणून बक्षीस देण्यात आले?
- विद्यार्थ्यांमध्ये वाचनकौशल्य वाढावे, यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील, यावर गटात चर्चा करा. त्याची यादी तयार करा.
उत्तर
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो.
- वरील बातमी १६ ऑक्टोबरची आहे.
- वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी, पथनाट्य व उत्कृष्ट वाचन स्पर्धा इत्यादी स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
- इयत्ता सातवीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास 'उत्कृष्ट वाचक' म्हणून बक्षीस देण्यात आले.
- विद्यार्थ्यांमध्ये वाचनकौशल्य वाढावे, यासाठी खालील उपक्रम आयोजित करता येतील:
- मुलांचे गट पाडून पुस्तक समीक्षण चर्चा करता येईल.
- वर्गात दर आठवड्यातील एका दिवशी वाचनालयातील एका पुस्तकावर गट चर्चा करता येईल.
- शाळेने विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्यांना उत्तेजनार्थ म्हणून पुस्तके भेट स्वरूपात द्यावीत.
- सामाजिक बांधिलकी म्हणून जवळच्या अनाथालयातील मुलांना गोष्टीची पुस्तके वाचून दाखवता येतील.