हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने, तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी/तास आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने, तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी/तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासांत पूर्ण केला असेल, तर विशालने बसने किती किमी प्रवास केला?

योग

उत्तर

समजा, विशालने बसने पूर्ण केलेले अंतर x किमी व विमानाने पूर्ण केलेले अंतर y किमी आहे.

दिलेल्या पहिल्या अटीनुसार, विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने, तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले.

त्यामुळे, पार केलेले एकूण अंतर 1900 किमी आहे.

∴ x + y = 1900    .....(i)

`वेळ = (अंतर)/(वेग)`

∴ बसने x किमी अंतर कापण्यास लागणारा वेळ = `x/60` तास

विमानाने y किमी अंतर कापण्यास लागणारा वेळ = `y/700` तास 

दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी/तास आहे.

∴ `x/60 + y/700 = 5`

∴ `(700 x + 60 y)/(60 xx 700)` = 5

∴ 700x + 60y = 5 × 60 × 700

∴ 70x + 6y = 21000     ....(ii)  [दोन्ही बाजूंना 10 ने भागून]

समीकरण (i) ला 6 ने गुणून,

6x + 6y = 11400    ....(iii)

समीकरण (ii) मधून समीकरण (iii) वजा करून,

70x + 6y = 21000
6x + 6y = 11400
-    -         -         
64x   =  9600

∴ x = `9600/64`

∴ x = 150

∴ विशालने बसने 150 किमी प्रवास केला.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांचे उपयोजन (Application of simultaneous equations)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.5 [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.5 | Q 6. | पृष्ठ २६

संबंधित प्रश्न

वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा.


समीकरणे सोडवून उत्तर लिहा.

100 रुपयांच्या नोटांची संख्या `square` 50 रुपयांच्या नोटांची संख्या `square`


मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.


एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापांतील फरक 10° असल्यास मोठ्या कोनाचे माप किती? 



एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 52 सेमी असल्यास आयताची लांबी किती?


एक व्यक्ती एका निश्चित पगार आणि दरवर्षी ठरावीक वेतनवाढ या अटींवर नोकरी सुरू करते. 4 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 15000 आणि 10 वर्षांनी पगार रुपये 18000 असल्यास त्या व्यक्तीचा मूळ पगार आणि वेतनवाढ काढा.


एका अंकगणिती श्रेढीसाठी t17 = 54 आणि t9 = 30 असल्यास प्रथम पद (a) आणि सामान्य फरक (d) काढा. 


कोणतीही दोन एकसामयिक समीकरणे लिहा- ज्यामध्ये चलांच्या किमती 12 आणि 10 असतील.


एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेमी आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×