Advertisements
Advertisements
प्रश्न
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
उत्तर
विश्वकोश हा केवळ शब्दकोश नसतो. त्यात विशिष्ट शब्दाचा अर्थ, संदर्भ, इतिहास यांचा समावेश असतो. त्यामुळे, एखाद्या शब्दाशी निगडित घटना, त्याचा ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ, त्याचा उगम आणि ज्ञानक्षेत्रातील त्याचे स्थान यांचे ज्ञान प्राप्त होते. विश्वकोशात एकाच शब्दाचे वेगवेगळे संदर्भ सापडतात. हे संदर्भ अभ्यासणे ही एक आनंददायक प्रक्रिया असून त्यामुळे भाषासमृद्धीही घडून येते.
मुख्य विषयातील शब्दाचा संदर्भ शोधताना त्या विषयाशी संलग्न इतर विषयांचे ज्ञान प्राप्त करणे विश्वकोशामुळे शक्य होते. विश्वकोशाचा हा सर्वांत मोठा फायदा आहे. विश्वकोश हा सर्वविषयसंग्राहक असल्याने याद्वारे अनेक क्षेत्रांच्या ज्ञानाची दरवाजे आपल्यापुढे खुली होतात. त्यामुळे, आपल्यात चिकित्सक, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.
- ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
- एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण...'
- तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक (देशभक्त).
- ‘सुधारक’ चे संपादक.
- कवी यशवंत यांचे आडनाव.
- विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
- मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
- कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग -
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितिप्रक्रिया -
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.