Advertisements
Advertisements
प्रश्न
विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
उत्तर
(१) विस्तृत व्यापारी शेतीच्या शेताचा आकार खूप मोठा असतो.
(२) येथे एकूण लोकसंख्या कमी असल्यामुळे भांडवल आणि आधुनिक कृषी पद्धतींचा वापर करून शेती केली जाते.
(३) विस्तृत व्यापारी शेतीला देखील एकपिकी पद्धतीची शेती म्हटले जाते.
(४) विशाल क्षेत्रात गहू, मका यांसारखी धान्य पिके व्यापारी तत्त्वावर घेतली जातात आणि हे उत्पादन आंतरराष्ट्रीय व्यापारात विकले जाते.
(५) काही भागात विस्तृत व्यापारी शेती आणि व्यापक स्वरूपातील पशुपालन या एकत्रित क्रिया केल्या जातात.
(६) पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व कामे यंत्रांच्या साहाय्याने केली जातात.
(७) या शेतीत हेक्टरी उत्पादन कमी असते, मात्र एकूण उत्पादन जास्त असते.
(८) समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश, प्रेअरी, पंपास, स्टेप्स, व्हेल्ड आणि डाऊन्स या गवताळ प्रदेशांत गहू आणि मका या पिकांचे भरघोस उत्पादन घेतले जाते.
(९) दक्षिण अमेरिकेत पंपास गवताळ प्रदेशात या पिकांवर आधारित पशुपालन करून मांस निर्यातही केली जाते.
(१०) विस्तृत व्यापारी धान्य शेतीच्याही काही समस्या आहे कीटकनाशके आणि खतांचा अतिरेकी वापर, आधुनिक तंत्रज्ञानावर वाढते अवलंबित्व आणि भांडवलाची गरज या समस्या या शेतीला भेडसावतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______.
सांगड घालून साखळी पूर्ण करा:
'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ | 'क' स्तंभ |
सखोल उदरनिर्वाह शेती | डॉगर बँक | शेतीचा आकार लहान |
पंपाज गवताळ प्रदेश | किनाऱ्यापासून दूर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन | प्रतिकूल परिस्थिती |
मत्स्यक्षेत्र | तांदूळ | बॉम्बे हाय |
फळे, कंदमुळे गोळा करणे | घनदाट वने | ईशान्य अटलांटिक महासागर |
खाणकाम | व्यापारी पशुपालन | दक्षिण अमेरिका |
मळ्याची शेती
भौगोलिक कारणे दया.
भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
फरक सांगा.
मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती.
सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.
मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा.
शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची २०१८ सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
खंड | प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी (सन २०१८) |
युरोप | ७.९१ |
आशिया | २४.४९ |
उत्तर अमेरिका | १४.९३ |
दक्षिण अमेरिका | १४.९४ |
आफ्रिका | ४७.२८ |
ऑस्ट्रेलिया | २७.७९ |
संदर्भ स्रोत: FAO- २०१८
१) कोणत्या खंडात १०% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
२) कोणत्या खंडात ४०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
३) दिलेल्या आकडेवारीकडे बघता, या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय?
विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.