Advertisements
Advertisements
प्रश्न
वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
उत्तर
मानवी जीवन बातम्यांनी वेढलेले आहे. बातमी वाचली वा सांगितली, तरी वाचकांच्या मनातील उत्सुकता संपत नाही. बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते. घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली जाते. परंतु घटनेच्या भोवताली असलेल्या अनेकविध कंगोऱ्यांचा वेध ज्या लेखनातून घेतला जातो, त्याला वृत्तलेख असे संबोधले जाते. बातमीत ज्या बाबी निदर्शनास येत नाहीत, त्या शोधून रंजक, नावीन्यपूर्ण पद्धतीने वृत्तलेखात मांडल्या जातात. वृत्तलेखाला इंग्रजीत फिचर असे म्हणतात. फिचर या शब्दाचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशातील अर्थ आहे, 'बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.' म्हणजेच बातमी ज्या घटनेविषयी आहे, त्याचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तलेख करीत असतात. वाचकांच्या मनात बातमीविषयी उत्कंठा वाढवणे, माहिती देणे, ज्ञान देणे, वृत्तलेखाचे महत्त्वाचे कार्य असते. वृत्तलेखाचा आशय, विषय, मांडणी, शैली वाचकांच्या अभिरुचीला साजेशी असते. वृत्तलेख बातमी आस्वादनीय रूप असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक स्पष्ट करा.
वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.
वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची गरज.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाचे स्रोत.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची भाषा
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची वैशिष्ट्य.
वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा
बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
वृत्तलेखाची लेखनशैली कशी असावी? ते तुमच्या भाषेत लिहा.
वृत्तलेखाची कोणतीही पाच वैशिष्ट्ये लिहा.
त्यातील मजकूर ______ त्याची आकर्षकता ______ वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी ______ आपलीशी वाटणारी ______ कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी ______ वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी.
‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.
‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.
व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.
वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा.
वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.
वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
बातमीवर आधारित वृत्तलेख ______ व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख ______ मुलाखतीवर आधारित वृत्ललेख ______ ऐतिहासिक स्थळ ______ गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.