Advertisements
Advertisements
प्रश्न
व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (02)
- तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
- रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.
2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (02)
- नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
- तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन): (04)
- उत्साहाला उधाण येणे
- गलका करणे
- झोकून देणे
संक्षेप में उत्तर
उत्तर
1.
- प्रश्नार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य्
2.
- कधीही खोटे बोलू नये.
- तुमची उर्जाशक्ती एकत्र करावी.
3.
- उत्साहाला उधाण येणे - खूप उत्साही वाटणे.
वाक्य - बाइर्नी वर्गात सहलीची सूचना वाचून दाखवताच मुलांच्या उत्साहाला उधाण आले. - गलका करणे - गोंगाट करणे.
वाक्य - बागेजवळ आईस्क्रीमची गाडी पाहताच खेळणारी सगळी मुले गलका करू लागली. - झोकून देणे - पूर्णपणे सहभागी होणे.
वाक्य - भूकंपग्रस्त गावाची अवस्था पाहताच सागररावांनी मदतकार्यात स्वत:ला झोकून दिले.
shaalaa.com
वाक्यरूपांतर
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?