Advertisements
Advertisements
प्रश्न
व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.
उत्तर
आपण खूपसे शब्द पाहतो, ऐकतो पण एखाद्या शब्दाबद्दल आपल्या मनात कुतूहल निर्माण होते आणि त्यासाठी आपण शब्दकोश पाहतो. उदाहरण, दिवाळी हा शब्द.
‘दिवाळी’ या शब्दाची व्युत्पत्ती पाहताना तो मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून आला. त्याचे मराठीत ‘दिवाळी’ असे रूप झाले.
व्युत्पत्तिकोशात त्या शब्दापुढे कंसात जात, लिंग व तो शब्द इतर भाषांमध्ये कसा आहे याचे लघुरूप दिलेले असते. या लघुरूपांचा अर्थ समजून घेतला असता आपणाला व्युत्पत्तिकोश पाहणे सोपे जाते. जसे- पु. म्हणजे पुल्लिंगी, स्त्री - स्त्रीलिंगी, नपुं - नपुंसकलिंगी असे प्रथम असते. दिवाळी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे त्याचापुढील कंसात प्रथम ‘स्त्री’ अशा शब्द येईल. त्यानंतर भाषेसाठीचे लघुरूप पुढीलप्रमाणे: सं - संस्कृत, हि - हिंदी, गु - गुजराथी याप्रमाणे इतर भारषांचीही लघुरूपे असतात. त्या-त्या शब्दासाठी त्या भाषेचे लघुरूप वापरलेले असते.
याप्रमाणे वर्णाक्षर, ऱ्हस्व-दीर्घ, आकार-उकार, जोडाक्षर यानुसार क्रमागत शब्दरचना केलेली असते.
या सर्वांची ओळख करून व्युत्पत्तिकोश पाहिल्यास आपणाला त्यात कोणतीच अडचण येणार नाही आणि शब्दांची व्युत्पत्ती पाहण्याचा आनंदही उपभोगता येईल.