हिंदी

योग्य जोड्या लावा. (i) शेती (ii) सूर्य (iii) वृक्ष (iv) पैठणी (v) भात ‘ब’ गट प्रकाश वस्त्र हंगाम ओंबी पाने एका शब्दात उत्तेर लिहा. पायापासून डोंगरापर्यंत पसरलेले पिवळसर हिरव्या रंगाचे - _____ -

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) शेती प्रकाश
(ii) सूर्य वस्त्र
(iii) वृक्ष हंगाम
(iv) पैठणी ओंबी
(v) भात पाने

 

           शेतीभातीचे ते दिवस व कापणीचा हंगाम, अगोदरच त्या गावाला झाडी अतोनात, तशात प्रातःकाळचा तो वेळ, सूर्य नुकताच वर आला होताच त्याचे कोवळे ऊन पावसाने आपल्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून टवटवीत केलेल्या वृक्षांची हिरवीगार पाने अधिक सतेज दिसत होती. सभोवार कणसांवर आलेली विस्तीर्ण शेतेच दृष्टीस पडत होती. आमच्या पायांपासून तो थेट समोरच्या डोंगरापर्यंत पिवळसर हिरव्या रंगाचे गालिचेच पसरले आहेत की काय असा भास होई. मधून-मधून नाचण्यांची हिरवीगार शेत दिसत, त्यामुळे असा भास होई की, सृष्टिदेवी हिरव्या बुट्टयांनी युक्त अशी पिवळी पैठणीच नेसून विहार करीत आहे. आत दाणा झाल्याकारणाने शेतातील भाताच्या ओंब्या अगदी वाकून गेल्या होत्या. नाना तऱ्हेचे व चित्रविचित्र रंगांचे पक्षी मंजूळ गायन करीत इकडून-तिकडे उडून जाताना दृष्टीस पडत आणि शेतामधून काम करणारी माणसेही मधून-मधून दिसत, शीतल व सुवासिक फुलांच्या वासाने सुगंधित असा वारा झुळझुळ वाहत होता. तो शेतावरून वाहताना समुद्रावर वर खाली होणाऱ्या लाटांप्रमाणे त्या शेतांची शोभा दिसत होती. वारा लागून त्या ओंब्याचा जो सळसळ आवाज होई तो किती मनोहर!

२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)

  1. पायापासून डोंगरापर्यंत पसरलेले पिवळसर हिरव्या रंगाचे - ______
  2. मंजूळ गायन करणारे - ______
संक्षेप में उत्तर

उत्तर

१. 

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) शेती हंगाम
(ii) सूर्य प्रकाश
(iii) वृक्ष पाने
(iv) पैठणी वस्त्र
(v) भात ओंबी

२.

  1. पायापासून डोंगरापर्यंत पसरलेले पिवळसर हिरव्या रंगाचे - गालिचे
  2. मंजूळ गायन करणारे - पक्षी
shaalaa.com
अपठित गद्यांश
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×