Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.
आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार
|
थोडक्यात उत्तर
उत्तर
पुणे : ७ सप्टेंबर : पुणे (वार्ताहर) कात्रज येथील विद्या मंदिर शाळेमध्ये दि. ५ रोजी शिक्षक दिनानिमित्त दुपारी ४ वाजता आदर्श शिक्षक पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला असे आमचे प्रतिनिधीकडून सांगण्यात आले. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या सोहळ्यामध्ये विविध विषयातील नामांकित अशा बारा शिक्षकांचा श्रीफल, शाल व मानपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जसे चांगला मूर्तिकार चांगली मूर्ती घडवितो तसे चांगले आदर्श शिक्षक चांगलेच विद्यार्थी घडवितात असे पाहुण्यांनी सांगितले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
shaalaa.com
बातमी लेखन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?