मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

आकृती पूर्ण करा. लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्त्व विशेष - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती पूर्ण करा.

आकृती

उत्तर

shaalaa.com
ऊर्जाशक्तीचा जागर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8.1: ऊर्जाशक्तीचा जागर - कृती [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 8.1 ऊर्जाशक्तीचा जागर
कृती | Q (२)(आ) | पृष्ठ ३०
बालभारती Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 1.2 अण्णा भाऊंची भेट
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ६

संबंधित प्रश्‍न

खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा.

लेखकाची माध्यमिक शाळा लेखकाला घडवणारे शिक्षक लेखकाचे जन्मगाव ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती मुंबईतील घराचे नाव
         

आकृती पूर्ण करा.


कारणे लिहा.

लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण ______


कारणे लिहा.

लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण ______.


‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

 १. आकृती पूर्ण करा. (०१)

 २. 'आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते.' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (०१)

शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्याचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे; पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे, की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये 'मालती निवासा' तील पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो.

आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने 'शाळेत कसा जाऊ?' असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!

२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. स्वमत (०३)

'तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान' या विषयावर तुमचे विचार लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

१. कोण ते लिहा.  (०१)

 अ) लेखकाला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवणारे – ______

आ) लेखक पुन्हा मनोमनी जातो ते ठिकाण – ______

२. आकृती पूर्ण करा. (०१)

याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हांला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.

एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, “माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.” एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न् क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळयांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो.

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

 अ) कागद कशामुळे जळाला?

 आ) लेखकाची संस्कार केंद्रे केणती?

३. स्वमत (०३)

'आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते' याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.


उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

१. कोण ते लिहा. (२)

  1. दारिद्रयाशी संघर्ष करणारी - ______
  2. मनाने श्रीमंत असणारे - ______
  3. अनवाणी शाळेत जाणारे - ______
  4. लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे - ______

शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहेत.

आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्रयाशी संघर्ष करणारी. माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!

पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.

२. योग्य जोड्या लावा: (२)

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) युनियन हायस्कूल (i) देशमुख गल्ली
(ii) दक्षिण गोवा (ii) महापालिकेची प्राथमिक शाळा
(iii) ‘मालती निवास’ (iii) गिरगाव
(iv) खेतवाडी (iv) माशेल

३. व्याकरण: (२)

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखून लिहा:

  1. ती खचली नाही.
  2. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे, खालावलेली.

४. स्वमत: (२)

‘आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते,’ हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कोण ते लिहा. (2)

  1. ‘माशेल’ गाव सोडणारे - ______
  2. वयाच्या सहाव्या वर्षी वारणारे - ______

             आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!

             पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत. (3)

‘शिक्षण घेण्यासाठी ‘गरिबी’ हा अडसर ठरत नाही’, या विधानाबाबत तुमचे मत लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. का ते लिहा. (2)

  1. भावे सर फक्त भौतिकशास्तराचे शिक्षकच नव्हते, कारण ______
  2. माशेलकरांना जीवनात भरपूर यश व कीर्ती मिळाली, कारण ______

           याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हांला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गाेडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.

           एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, ‘‘माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.’’ एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

           आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

लेखकांना शैक्षणिक जीवनात मोलाचे साहाय्य करणाऱ्या व्यक्तींबद्दलचे मत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×