Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
- वरील प्रक्रियेत कोणती ऊर्जानिर्मिती होते?
- ऊर्जानिर्मिती केंद्रात कोणत्या प्रकारचे इंथन वापरले आहे?
- या ऊर्जानिर्मिती केंद्रामुळे निर्माण होणारी एक समस्या सांगा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- दिलेल्या आकृतीत औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्र दर्शवले आहे, ज्यामध्ये कोळशामधील रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते.
- औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्रात कोळसा हे इंधन वापरले जाते.
- ऊर्जानिर्मिती केंद्रामुळे निर्माण होणारी समस्या:
- हवेचे प्रदूषण: कोळसा जळताना कार्बन डायऑक्साइड, सल्फर ऑक्साइड, आणि नायट्रोजन ऑक्साइड यांसारखे आरोग्यासाठी हानिकारक वायू आणि सूक्ष्म धुरकण वातावरणात उत्सर्जित होतात, ज्यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार होऊ शकतात.
- अपारंपरिक संसाधनांचा ऱ्हास: औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये इंधन म्हणून वापरला जाणारा कोळसा हा भूगर्भातील मर्यादित साठा आहे, आणि भविष्यात त्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?