Advertisements
Advertisements
प्रश्न
आंतरजालाच्या साहाय्याने अंदमान-निकोबार या बेटांची माहिती खालील मुद्द्यांच्या आंधारे मिळवा.
- तेथील आदिवासी
- आदिवासींचे जीवनमान
- निसर्गसौंदर्य
- तेथील सोईसुविधा
सविस्तर उत्तर
उत्तर
- तेथील आदिवासी: जारवा, ओनो, ग्रेट अंडमानीज, सेंटेनेलीज, शोम्पेंस आणि बो या जाती दिसून येतात. शोम्पेंस हे निकोबारचे मूळ निवासी आहे तर सेंटेनेलीज हे अंदमानचे मूळ निवासी आहेत. यांचा बाहेरील जगाशी जास्त संबंध येत नाही.
- आदिवासींचे जीवनमान: आजही हे लोक धनुष्यबाणाने मासे व प्राणी यांची शिकार करतात. प्राण्यांचे मांस हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. तसेच स्त्री-पुरुष उंच झाडांवरून मध गोळा करतात. या लोकांना 150 पेक्षा जास्त झाडे व 250 पेक्षा जास्त प्राण्यांचे ज्ञान आहे. त्यांची घरे घुमट आकाराची असतात. संगीत-नृत्य यांची त्यांना आवड आहे.
- निसर्गसौंदर्य: या बेटांवर काही ठिकाणी हिरवागार तर काही ठिकाणी गडद निळा भासणारा समुद्र दिसतो. मध्येच कुठेतरी हिरवळ दिसते. पाण्यात ठिकठिकाणी विखुरलेली बेट बघायला मिळतात. तसेच तेथील पाण्यात उंच उडी घेणारे चंदेरी मासे या निसर्गसौंदर्यात भर घालतात. आशियातल्या सगळ्यात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक अशी याची ख्याती आहे. शंख, शिंपले, चांदीचे वालुकामय किनारे जणू येथील सौंदर्य आहे. साऊथ बटन म्हणजे समुद्रात बेटासारखा उभा ठाकलेला नुसता खडक आणि त्या खडकाच्या आधाराने वाढलेले जंगल म्हणजे अवर्णनीय निसर्गसौंदर्य होय.
- तेथील सोईसुविधा: या ठिकाणी कमी खर्चिक हॉटेल्स आहेत. तसेच गेम फिशिंग व सी वॉक म्हणजेच पाणबुड्यासारखं हेल्मेट घालून समुद्र तळावर चालणं हे इथं करता येते. तसेच काचेच्या तळाच्या बोटींमधून पाण्याखालचे जग बघता येतं. या संदर्भात अत्यंत सुंदर सुविधा उपलब्ध आहे. तसेच विनायक दामोदर.सावरकर यांची कोठडी पाहण्यासाठीची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?