मराठी

आपण जेथे राहू आणि पाहू तेथे परमेश्वरच आहे. आपण आंधळे आहोत. आपण झाडामाडातच देव पाहतो; परंतु मानवातील देव आपणास दिसत नाही. आपणास चार तोंडाचा, आठ हातांचा असा देव हवा असतो. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

            आपण जेथे राहू आणि पाहू तेथे परमेश्वरच आहे. आपण आंधळे आहोत. आपण झाडामाडातच देव पाहतो; परंतु मानवातील देव आपणास दिसत नाही. आपणास चार तोंडाचा, आठ हातांचा असा देव हवा असतो. मनुष्याहून किती तरी निराळा असा देव आपणास हवा असतो. मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला देव आपणास दिसत आहे. या मानवाजवळ आपण भांडतो. त्याला आपण गुलाम करतो त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो. भगवंतांना याचे आश्चर्य वाटते, तो म्हणतो, “अरे मनुष्यातील देव पाहा. हाच बोलता-चालता देव आहे. याचे स्वरूप बघा- याला काय हवे, नको ते पाहा.” दगडाच्या देवाला काय आवडते हेही आपण ठरवून टाकले आहे.

            गणपतीला मोदक आवडतो, विठोबाला लोणी आवडते, खंडोबाला खोबरे हवे; परंतु मानवाला काय हवे? याची विवंचना आपण कधी करतो काय? आपल्या सभोवती दोन हातापायांचा देव उभाआहे त्याच्या पोटात अन्न नाही, त्याच्या अंगावर वस्त्र नाही, त्याच्या पूजेला आपण येतो का धावून?

टीपा लिहा

उत्तर

परमेश्वर सर्व ठिकाणी असला तरी आपण आंधळेपणाने चार तोंडाचा, आठ हातांचा देव पाहिजे म्हणुन बसतो. मानवातील देव आपणाला दिसत नाही. तो आपणाला उपयोगी पडत असूनसुद्धा त्याच्याबरोबर भांडतो. त्याची कत्तल करतो आणि त्याला गुलाम बनवितो. तसेच देव मानून गणपतीला मोदक, विठोबाला लोणी, खंडोबाला खोबरे देतो. पण भुकेल्या माणसाला अन्न-वस्त्र दिले तर प्रत्यक्ष देवालाच पोहोचेल. मानवातील देव ते सर्व आनंदाने स्वीकारेल.

shaalaa.com
सारांश लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×