Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
![]() |
“आरोग्यम् धनसंपदा” टिळक स्पोर्ट्स ४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० |
![]() |
||
सेल | सेल | सेल | ||
खेळ सात दिवस चालू |
आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच. आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते. भरपूर स्टॉक! वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत |
![]() |
||
अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने | ||||
वरील जाहिरातीवरून आपल्या क्लबला क्रीडा-साहित्य पुरवण्यासाठी पत्र लिहा. |
उत्तर
दिनांक - १५ ऑक्टोबर, २०२२
प्रति,
मा. व्यवस्थापक,
टिळक स्पोर्ट्स,
४३२, सदाशिव पेठ,
पुणे-४११०३०.
विषय - खेळाच्या साहित्याबाबत.
महोदय,
स. न. वि. वि.
आम्ही आपल्याच परिसरामध्ये स्वराज क्रीडा क्लब स्थापन केला असून मी त्याचा अध्यक्ष आहे. मुला-मुलींनी अधिक संख्येने क्रीडांगणावर यावे आणि निरनिराळ्या खेळांमध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने आम्ही स्वराज क्रीडा क्लबची स्थापना केली.
आमच्या क्लबसाठी विविध क्रीडा साहित्याची आवश्यकता असल्याने त्याची यादी सोबत जोडली आहे.
तरी कृपया आम्हांला यादीप्रमाणे चांगले व माफक दराने क्रीडा साहित्य पाठवून द्यावे. सर्व साहित्य मिळाल्यावर लगेच बिलाची रक्कम अदा केली जाईल याची हमी देत आहे. तेव्हा खालील पत्त्यावर साहित्य पाठवावे हि विनंती.
कळावे,
आपला
अनुराग कुलकर्णी
स्वराज क्रीडा क्लब,
बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, पुणे
क्रीडा साहित्याचे नावे | नग |
फुटबॉल | ५ नग |
क्रिकेटचा सेट | २ नग |
बॉल | १ |
बॅटमिंटन नेट | १ |
बॅटमिंटन रॅकेट्स | ४ नग |