मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

अभिव्यक्ती. ‘कृत्रिम पायाच्या मदतीने दि व्यां गत्वाव र मात करता येते’, हे सोदाहरण स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

अभिव्यक्ती.

‘कृत्रिम पायाच्या मदतीने दि व्यां गत्वाव र मात करता येते’, हे सोदाहरण स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

जयपूर फूट आता जगप्रसिद्ध झाला आहे. आजपर्यंत हजारो विकलांग लोकांनी हा कृत्रिम पाय बसवून घेतला आहे. ही मुलेमाणसे आता सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. यांच्या कथा प्रेरणादायक आहेत.
एक कथा आहे नायरा नावाच्या तीन वर्षांच्या मुलीची. तिचे वडील स्वतः फार्मासिस्ट आहे. नायरा जन्मतः च कमकुवत होती. तीन वर्षांपर्यंत तिला उभे राहता येत नव्हते, चालता येत नव्हते. हा जयपूर फूट बसवल्यावर मात्र नायरा सोबतच्या मुलीबरोबर खेळू लागली; बागडू लागली; धावू लागली.
कॉर्पोरेट जगताने आता यात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांपैकी एक आहे - लेमन ट्री हॉटेल. एक २३ वर्षांचा तरुण पायाने अधू होता. त्याला एक दानशूर व्यक्तीने जयपूर फूट बसवून दिला. तो आता सहायक म्हणून या हॉटेलमध्ये काम करतो. हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांची देखभाल करण्याचे काम तो करतो. तो आता हॉटेलचा मॅनेजर होण्याचे स्वप्न पाहत आहे. त्या कंपनीत आतापर्यंत ४०० विकलांगांची भरती केली गेली आहे.
एकंदरीत, विकलांगत्वावर मात करून सर्वसाधारण माणसाचे आयुष्य नक्की जगता येऊ शकते, हे आता सगळ्यांनाच मान्य झालेले आहे.

shaalaa.com
जयपूर फूटचे जनक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.12: जयपूर फूटचे जनक - कृती [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 2.12 जयपूर फूटचे जनक
कृती | Q 2 | पृष्ठ ६१

संबंधित प्रश्‍न

परिणाम लिहा:

घटना

परिणाम

(१) अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला.

______________

(२) परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते.

______________


दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

‘नाचे मयूरी’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. सुप्रसिद्ध नर्तिका सुधा चंद्रन हिच्या आयुष्यावर तो आधारित होता. एका अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला होता. साहजिकच तिचं नृत्य कायमचंच बंद पडण्याच्या मार्गावर होतं; पण सुधा जयपूरला गेली आणि तिथं तयार करण्यात आलेला कृत्रिम पाय आपल्या गमावलेल्या पायाच्या जागी बसवला. नृत्याची कारकीर्द तिनं नव्यानं सुरू केली आणि त्या कृत्रिम पायाच्या आधारानं तिनं भरघोस यश मिळवलं. सुधानं बसवून घेतलेल्या त्या कृत्रिम पायाचंच नाव आहे ‘जयपूर फूट’. जयपूरमधल्या एका रुग्णालयात तो प्रथम विकसित केला गेला म्हणून त्याला ते नाव मिळालं.

जयपूरच्या रुग्णालयात डॉ. प्रमोद किरण सेठी अनेक विकलांगांवर उपचार करत होते. पोलिओची बाधा झाल्यामुळे दिव्यांगत्व आलेल्या मुलांना पाहून त्यांना एक कल्पना सुचली. पंडित राम चरण शर्मा या कलाकाराला विविध प्रकारची विलक्षण साधनं तयार करताना त्यांनी पाहिलं होतं. त्यांनी पंडितजींना रुग्णालयात येण्याचं आमंत्रण दिलं.

पंडितजींनी रुग्णालयात, ज्यांचे पाय काही कारणांनी गमावले आहेत अशांना परदेशातून आयात केलेले, महागडे कृत्रिम पाय बसवताना पाहिलेलं होतं. ते परवडणारे नव्हते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांचीही चाल काही सुलभ होत असताना त्यांना दिसली नव्हती. ते पाहून त्यांच्या कल्पकतेला आव्हान मिळालं. त्यांनी व्हल्कनाईज्ड रबर आणि लाकूड या सहजगत्या उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून हालचाल करण्यास सुलभ असा पाय तयार केला. डॉ. सेठी यांनी तो आपल्या एका रुग्णाला बसवून पाहिला. त्यासाठी शस्त्रक्रियेची नवी पद्धत विकसित केली. त्या रुग्णाला त्याचा फायदा झाल्याचं पाहून त्यांनी पंडितजींना आणखी तसेच पाय तयार करायला सांगितलं. आता परदेशातून कृत्रिम पाय आयात न करता हे लाकडी पाय बसवण्याचाच सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला तर पंडितजींनी बांबूचाच वापर केला होता; पण हळूहळू इतरही पदार्थांचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली. आता जगभर त्याचं रोपण केलं जातं. अद्ययावत प्लास्टिक व ॲल्युमिनियम यांचा वापरही आता करण्यात येतो. पण मूळ कल्पना मात्र पंडितजींचीच राहिली आहे.

(१) पुढील घटनांचे उताऱ्याचा आधारे सूचनेनुसार कृती करा. (२)

  1. अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला.
  2. पंडितजींनी कृत्रिम पाय बसवला.

(२) खालील कृती करा. (२)

  1. कृत्रिम पायाचंच नाव ______ आहे.
  2. कृत्रिम पायाची मुळ कल्पना ______ आहे.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×