Advertisements
Advertisements
प्रश्न
अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांंना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?
लघु उत्तर
उत्तर
अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले, की अत्यंत देखणा असा माळढोक पक्षी भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी वनविभागाने हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण तो शेतातील किड्यांवर गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो त्यामुळे त्यांची संख्या कमी आहे. शिवाय, इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली, तर ती संख्या आणखीनच कमी होते.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?