Advertisements
Advertisements
प्रश्न
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी
या ओळीचे रसग्रहण करा.
उत्तर
सुप्रसिद्ध कवयित्री हिरा बनसोडे लिखित ‘आरशातली स्त्री’ कवितेतील या पद्यपंक्तीअसून त्यांची ही कविता ‘फिनिक्स’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे. स्त्रीजीवनातील स्थित्यंतरे हा कवितेचा विषय असून प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये स्थित्यंतरे होत असतात. या स्थित्यंतराचा वेध घेत असता कवितेतील नायिकेचे संसारात पडण्यापूर्वी आयुष्य कसे होते? व संसारात पडल्यानंतरचे आयुष्य कसे झाले ही कवितेची मध्यवर्ती कल्पना असून कवयित्रीने या स्थित्यंतराचा मागोवा घेतला आहे. आपल्या आयुष्याचा शोध घेणारी आरशातली स्त्री म्हणजे तिचे प्रतिबिंब असून ती जेव्हा आरशातील प्रतिबिंब पाहते तेव्हा ती मीच का? असा तिला प्रश्न पडतो याचे कारण म्हणजे तिच्यात झालेले बदल आरशाबाहेरील स्त्रीचे आरशातील स्त्रीशी संवाद सुरू होतात आणि तिचा भूतकाळ, तिचे प्रतिबिंब वा तिच्यातील हरवलेली ती पुन्हा बोलू लागते. गतआयुष्यातील हवेहवेसे वाटणारे चांदणे आज तुझ्या अंगणत लख्ख प्रकाश घेऊन आले आहेत. आणि त्याकडे तुझे लक्ष नाही कारण त्यांना दार उघडून आत घेण्याचे तुला यत्किचितही भान नाही. तरुणपणी नवयौवनावस्थेत असताना याच आईजवळ बसून कितीतरी स्वप्ने पाहणारी तू मात्र आज ती तुझी वाट पाहून थकून जाते. तिचे वाऱ्यावर डुलतानाचे अल्लडपण याचे तुला विस्मरण झाले असून पारंपरिक वरदान म्हणूज तुला मिळालेल्या तुझ्या संसारामध्ये तू अस्तित्वहीन झालीस. जे तू पूर्णपणे विसरून गेलीस कारण आज तू निर्जीव अशी पुतळी झालेली आहेस इथे नायिका आपल्या आयुष्यात पूर्णपणे स्वातंत्रय हरवूल बसली आहे. या संसाराच्या बंधनात ती इतकी व्यस्त होते की तिला तिच्या अस्तित्वाचेही भान नाही. आपल्या संसारासाठी फक्त काबाडकष्ट करणे इतकेच तिला माहिती आहे. या काबाडकष्ट करण्यामध्ये ती आपल्या इच्छा-आकांक्षा दूर सारते. नीतिनियमांचे पालन करत ती हालअपेष्टा सहन करत आपली स्वप्न, महत्त्वाकांक्षा, ध्येय बाजूला सारून आपल्या भावना दडपून ती एक निर्जीव वस्तू बनते. या निर्जीव वस्तूला कवित्री ने ‘पुतळी’ अतिशय सूचक असा शब्द वापरला आहे. तसेच चांदणे, अल्लड जाई, पेंगुललेली, प्राण हरवलेली अशाप्रकारे सूचक असे समर्पक विशेषणे, परिणामकारक स्थितीदर्शक शब्दप्रयोग वापरले आहेत. प्रतिमा-प्रतिकांचाही चपखल वापर करून मुक्तछंदात ही कविता लिहिली आहे. तसेच इथे कवयित्री ने संवादात्मक शैली योजनामुळे कवितेची परिणामकारकता वाढली आहे.