Advertisements
Advertisements
प्रश्न
अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणूची आवश्यकता स्पष्ट करा. दोन संदर्भ अणूंची माहिती द्या.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- अणू इतके लहान आहेत की ते अणू वस्तुमानाद्वारे अचूकपणे मोजले जाऊ शकत नाहीत, म्हणून त्यांच्या वस्तुमानांची तुलना सापेक्ष पातळीवर एका संदर्भ अणूशी करण्यात येते. त्यामुळे, अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज असते.
- हायड्रोजन अणू सुरुवातीला संदर्भ अणू म्हणून निवडला गेला कारण तो सर्वात हलका आहे. ज्याच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 1 आहे असे गृहीत धरले गेले होते, त्यामुळे वेगवेगळ्या अणूंच्या सापेक्ष अणुवस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमानांकाइतके म्हणजेच प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्या एकत्रित संख्येइतके झाले. तसेच, मापनश्रेणीत अनेक मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने अपूर्णांकी आल्याने वेगवेगळ्या अणूंची संदर्भ अणू म्हणून निवड झाली.
- अन्य संदर्भ अणू म्हणजे कार्बन होय. या मापनश्रेणीत कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान १२ स्वीकारले. कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान `12 xx 1/12` म्हणजेच 1 असे ठरते.
shaalaa.com
अणूचे वस्तुमान
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?