Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!
|
सहल प्रमुख या नात्याने |
तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा. |
थोडक्यात उत्तर
उत्तर
दिनांक: ६ ऑक्टोबर, २०१८
प्रिय मित्र,
सुरेश यांस,
स. न. वि. वि.
पत्रास कारण की, बरेच दिवस झाले, तुझा-माझा काहीच पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे काहीच हकीकत कळली नाही, तेव्हा तू कसा आहेस?
आता विशेष म्हणजे आमच्या जवळच असलेले औंध येथील वस्तुसंग्रहालय ५ ते १५ ऑक्टोबर, २०१८, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले केले आहे. तेव्हा आपण ते बघून यावे असे वाटते. शाळेत असताना सहलीतून आपण ते पाहिले त्यानंतर आता बऱ्याच दिवसात तिकडे गेलो नाही आणि पूर्वीचे विशेष आता आठवत नाही. तेव्हा तू इकडे ये म्हणजे आपणास मिळून जाता येईल. वाट पाहत आहे.
तुझ्या घरी नेहमीप्रमाणे माझा नमस्कार सांग.
कळावे,
तुझा मित्र,
अशोक भोसले.
shaalaa.com
पत्रलेखन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?