मराठी

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले! दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८ वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
 तुमच्या शाळेला परवानगी मिळण्याबाबत पत्र लिहा.
थोडक्यात उत्तर

उत्तर

दिनांक: १० ऑक्टोबर, २०१८

अशोक भोसले,
सहल प्रमुख,
आदर्श विद्या मंदिर, नाशिक.

प्रति,
मा. व्यवस्थापक,
औंध वस्तुसंग्रहालय,
औंध, जि. सातारा.

विषय: वस्तुसंग्रहालय पाहाण्यास परवानगी मिळण्याबाबत.

महोदय,
स. न. वि. वि.

मी नाशिक येथील आदर्श विद्या मंदिर या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. सहल प्रमुख या नात्याने आम्ही दरवर्षी मुलांना विविध ठिकाणी घेऊन जात असतो.

काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपले वस्तुसंग्रहालय ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाहण्यास खुले केले आहे हे वाचून आम्हांला समाधान झाले. जुन्या-पुराण्या वस्तूंचे आपण खूप काळजीपूर्वक जतन केले आहे. तसेच आपल्या वस्तुसंग्रहालयाचा नावलौकिक, सगळीकडे परिचित आहेच. तेव्हा तुमच्या वस्तुसंग्रहालयातील विविध व दुर्मीळ वस्तूंचे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप चांगले ज्ञान मिळेल. तेव्हा संग्रहालय पाहण्यास परवानगी मिळावी. आमच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांची संख्या चाळीस आहे.

कळावे,
आपला कृपाभिलाषी,
अशोक भोसले,
सहल प्रमुख,
आदर्श विद्या मंदिर, नाशिक.

shaalaa.com
पत्रलेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×