Advertisements
Advertisements
प्रश्न
बेकर्स यीस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक कशी ठरतात?
टीपा लिहा
उत्तर
- पाव बनवताना किण्वन प्रक्रिया होण्यासाठी पीठात बेकर्स यीस्ट म्हणजेच सॅकरोमायसिस सेरेव्हिसी घातला जातो.
- व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित यीस्ट चा वापर होतो. कोरड्या, दाणेदार स्वरूपातील यीस्ट घरगुती बेकिंग साठी वापरतात.
- व्यावसायिक उपयोगासाठी यीस्ट वापरून बनवलेल्या पीठामध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्त्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यात ऊर्जाही जास्त असते. त्यात किण्वनामुळे पौष्टिकता देखील निर्माण होते.
- त्यामुळे अशा पिठापासून बनवलेले पदार्थ, पाव व इतर उत्पादने पौष्टिक ठरतात.
shaalaa.com
पाव (Bread)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?