Advertisements
Advertisements
प्रश्न
भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य:
- दोन्ही देशांच्या अतिउत्तर, मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
- भारतातील अतिउत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यात व ब्राझीलमधील अतिउत्तरेकडील अमापा राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
- भारतातील मध्य भागातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटो ग्रासो राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
- भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या वाळवंटात व ब्राझीलमधील वायव्य भागातील ॲमेझॉनस राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
- भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते.
- भारत व ब्राझीलया देशांच्या लोकसंख्या वितरणातील फरक:
- भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते. याउलट, ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते.
- जनगणना २०११ नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ३८२ व्यक्ती प्रति चौकिमी होती. याउलट, ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता केवळ २३ व्यक्ती प्रति चौकिमी होती.
shaalaa.com
लोकसंख्या
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.
भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.
लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा.
लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा.
सागरी सान्निध्य, रस्त्यांची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उदयोगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निम-शुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.
भौगोलिक कारणे लिहा.
लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.