मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. स्वातंत्र्योत्तर कालखंडात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी १९४९ मध्ये ‘भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदे’ची (ICMR) स्थापना झाली.
  2. विविध रोगांवर संशोधन करणारी २६ केंद्रे देशभरात सुरू झाली. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
  3. याच क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (AIIMS) या संस्थेची स्थापना झाली.
  4. या संस्थेवर वैद्यकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शिक्षणाची जबाबदारी टाकली गेली.
  5. वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालये, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये होत.
  6. सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये, हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे या संस्थेने काढली.
  7. सरकारने वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी १९५८ मध्ये ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थेचे पुनर्गठन केले. या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीची जबाबदारी टाकली.
shaalaa.com
संशोधन संस्था - वैद्यक क्षेत्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.05: शैक्षणिक वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 1.05 शैक्षणिक वाटचाल
स्वाध्याय | Q ५. (३) | पृष्ठ ३०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×