Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे?
दीर्घउत्तर
उत्तर
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे.
- उद्देशिकेची सुरुवात 'आम्ही भारताचे लोक' या शब्दांनी होते; तर शेवट 'हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत' या शब्दांनी होतो.
- आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत, याची हमी दिलेली आहे.
- भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?