Advertisements
Advertisements
प्रश्न
भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत?
लघु उत्तर
उत्तर
अन्नामध्ये असलेले गुणधर्म बदलणे किंवा लपवणे, अन्नामध्ये हानिकारक किंवा विषारी पदार्थ मिसळणे, तसेच चुकीची लेबलं लावणे किंवा फसवणूक करणारे ब्रँडिंग करणे या प्रक्रियेला अन्नभेसळ म्हणतात.
भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. दीर्घकाळपर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत पारिणाम होतात. तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?