मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

(‘बिग ५’च्या सहवासात) पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

(‘बिग ५’च्या सहवासात) पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

लेखक नकुरू हे मसाईमारा असा एक मोटारीने प्रवास करीत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते मारा सिना लॉजकडे गेले होते. त्यात फरीदने गाडी कमरेएवढ्या उंच गवतात घुसवली. गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सगळे कुटुंब समोर आले होते. दोन-तीन सिंहिणी आणि त्यांची दहा बाळे होती. शेजारीच एक म्हैस मरून पडली होती. चार-पाच बछडे आणि सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या. खाण्याने सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक सिंहीण सिंहाजवळ आली आणि "मी पाणी पिऊन येते, तू जरा बछ्यांना सांभाळ" सिंहाला सांगून गेली, असा जणू त्यांचा संवाद झाला असावा. सर्व सिंह कुटुंबीयांनी मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळण्याचा प्रयत्न करत होता. सिंहाने ते थोडावेळ सहन केलं. पण नंतर एक हलकासा पंजा मारून, ‘त्रास देऊ नकोस’ म्हणून बछड्याला सुनावलं. हा सगळा चित्तथरारक सोहळा लेखकांच्या कुटुंबीयांनी अनुभवला.

shaalaa.com
'बिग ५’ च्या सहवासात
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15.2: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन) - स्वाध्याय [पृष्ठ ७०]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 15.2 ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ७०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×