Advertisements
Advertisements
प्रश्न
ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
- ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यांवर नैसर्गिकरीत्या बंधने पडली आहेत.
- या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी, येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही.
- या भागात वाहतुकीच्या सोईसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे.
shaalaa.com
ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ______ व्यवसायावर अवलंबून आहे.
ब्राझीलमधून प्रामुख्याने कोणत्या पिकांची निर्यात केली जाते?
भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे?
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत.
खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या
- आलेखात कोणती क्षेत्रे दर्शविलेली आहेत?
- भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे?
- ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
- दोन्ही पैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे?
- राष्ट्रीय उत्पादनात तृतीयक क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे?
- ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे?