मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

चौकटी पूर्ण करा. अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू - ______, ______, ______, ______. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

         अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला.

चौकटी पूर्ण करा.

अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू - ______, ______, ______, ______.

रिकाम्या जागा भरा

उत्तर

अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू - चुली, भांडीकुंडी, औते-हत्यारे, दागदागिने.

shaalaa.com
अपठित गद्यांश
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: हसरे दु:ख - अपठित गद्य आकलन [पृष्ठ ८१]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 18 हसरे दु:ख
अपठित गद्य आकलन | Q १. (अ) | पृष्ठ ८१

संबंधित प्रश्‍न

अपठित गद्य

प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस -
(ii) कलाम याना वाचनासाठी उत्तेजन देणारे -

(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागणारे -

(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रlचे वितरक -

जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या वैद्यानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या गावात एस. टी. आर माणिकन् नावाचे एक माजी क्राांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी कलाम याना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेने पंबन गावाहून वर्तमानपत्राचे गठ्ठे येत. पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी. दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या गाडीतून ते गठ्ठे फेकले जात. ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली. वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून  शिकण्यासाठी बाहेर जायला  हवे.’’ शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत जा. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’

(२) परिणाम लिहा.
(i) दुसरे महायुद्ध पेटले.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले.

(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.


(४) स्वमत - पाठाच्या आधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.


उतारा वाचून दिलेल्या कृती करा.

(अ) तक्ता पूर्ण करा.

जंगलाचा स्वभाव  माणसाचा स्वभाव
(१) ______ (१) ______
(२) ______ (२) ______

 

जंगलाने सर्वांचे स्वागत केले-दिलखुलास, मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा असतो. अढी धरावी, तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते. सहजसुंदर असते. ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना, हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्रचर्र आवाज उठायचा. जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांद्या, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते.

-राजा मंगळवेढेकर.

(आ) चौकटी पूर्ण करा.

(इ) खालील कृती करा.

(१) खालील शब्दांची जात ओळखा.

(i)  
(ii) 

(२) सूचनेप्रमाणे सोडवा.
(i) जंगल मनमोकळे असते. (काळ ओळखा.)
(ii) सहसंबंध लिहा. - कोपरे : `square` पाने : पान

  • स्वमत.
    जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा.

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

  1. परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
  2. झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.

चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत.

ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

२. आकलन कृती 

  १. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)

  1. पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
  2. हृदयाला आनंद बहाल करणारा ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 

  i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात. (०१)

   अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात.

    ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.

    क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते.

    ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे.

 ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक ______ (०१)

     अ) गुंतलेली गोष्ट असते.

     ब) विखुरलेली गोष्ट असते.

     क) अंतरावरील गोष्ट असते.

     ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते.

दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो.

२. आकलन कृती 

  १. वैशिष्ट्ये लिहा. (०२)

   खऱ्या नात्यामधील संवेदना

  1. ______
  2. ______
  3. ______
  4. ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)

i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात.  (१)

अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात.

ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.

क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते.

ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे.

ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक _____   (१)

अ) गुंतलेली गोष्ट असते.

ब) विखुरलेली गोष्ट असते.

क) अंतरावरील गोष्ट असते.

ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते.

दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बर्याचदा आपल्य दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो.

२) वैशिष्ट्ये लिहा. (२)

खऱ्या नात्यामधील संवेदना

  1. ______
  2. ______
  3. ______
  4. ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये? संकटांचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परंतु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.

(2) कधी ते लिहा: (2)

  1. आपण संकटांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही.
  2. आजारी, संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) चौकटी पूर्ण करा: (2)

(य) अर्थयुक्त असणारे - ______

(र) अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्यकृतीचा उलगडतो तो - ______

साहित्यकृती शब्दांनी बनलेली असते. शब्द अर्थयुक्त असतात. तो अर्थ एकपदरी अथवा अनेकपदरी असतो. प्रतिमा, प्रतीक हे ही शब्दच असतात. त्यात एकाहून अधिक अर्थ असतात. भाषेतील रूपकप्रक्रियेने अर्थाचे विश्व व्यापक केलेले असते. शब्दांच्या साहाय्याने साहित्यकृतीत पात्रे, प्रसंग, वातावरण निर्माण केलेले असते. शब्दार्थजनित कल्पित विश्वाची निर्मिती साहित्यकृतीत होत असते. त्या विश्वाचे बाह्य जगाशी साधर्म्य किंवा वैधर्म्य असते. अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्यकृतीचा आशय उलगडतो. मिथक, आदिबंध यांनी त्या आशयाला एक परिमाण दिलेले असते; तर शब्दांच्या अर्थांतून व्यक्त होणाऱ्या विचारप्रणालीने, जीवनविषयक भूमिकेने दुसरे परिमाण दिलेले असते. साहित्यकृतीत विविध व्यक्ती, समाजगट, व्यक्तीची मने, व्यक्ती आणि समाजगट यांच्यातील संबंध शब्दार्थांतून व्यक्त झालेले असतात. व्यक्तींना, व्यक्तिसमूहांनां सामाजिक संदर्भ असतो. त्या समाजगटाची, समाजाची विशिष्ट संस्कृती असते. माणसांच्या सर्वसाधारण व्यवहारात 'बोलणे' हा एक महत्त्वाचा व्यवहार असतो. ते बोलणे अगदी साधे. निर्देशात्मक, भावनात्मक, विचारप्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक, आंतर असे असू शकते.

- वसंत आबाजी डहाके  

(२) खालील कृती करा: (२)

माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा:

(य) ______

(र) ______


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृती पूर्ण करा. (2)

           सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणुस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभाव जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे, त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते.

2. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. सुजनांकडून अपेक्षित असलेले - ______
  2. सौजन्यातून व्यक्त होणारे - ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) चंदीपूर चेन्नई
(ii) अण्वस्त्र चाचण्या शिक्षणाची सोय
(iii) अण्णा युनिव्हर्सिटी ओरिसा
(iv) खेड्यापाड्यात जावेद मियाँदाद
(v) लहान पोरगा डॉ. कलाम

 

       त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू; परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे- खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची, हाच असे. श्री. कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे, त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे.

       मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियाँदाद नावाच्या एखादा लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते. जावेदने मला सांगितले होतं- ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते. कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिट्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले, “केवढा मोठा विचार हा!” ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं, अण्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्षे ते ओरिसातच राहिले होते.

       “तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात, तर त्यासाठी मी जरूर येईन,” ते म्हणाले. तुम्ही तिथे बरचं काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हांलासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे. याची मला कल्पना आहे.

२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

  1. ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - ______
  2. लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

          दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला, तर आई त्याला भिक्षा घालत असे. एके दिवशी एक धडधाकट भिकारी आला असता रुक्मिणीबाई त्याला भिक्षा घालू लागल्या. विनोबा त्यांना म्हणाले, “हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा देत गेलो, तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान केले, तर त्यामुळे दान देणाऱ्याचेही अकल्याण होते.”

          रुक्मिणीबाईंनी ते शांतपणे ऐकले आणि म्हणाल्या, “विन्या, पात्र-अपात्र यांची परीक्षा करणारे आम्ही कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्‍वररूप समजून त्याला शक्तिनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण”? विनोबांनी त्यावर टिपणी केलीय, की ‘आईच्या या युक्तिवादावर विन्याला दुसरा, युक्तिवाद सुचला नाही.’

(2) जोड्या लावा. (2)

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) दारावर भिक्षा मागायला येणारा  (1) रुक्मिणीबाई
(ii) भिकाऱ्याला भिक्षा घालणाऱ्या (2) विनोबा
(iii) आईच्या युक्तिवादावर टिपणी करणारे (3) भिक्षेकरी
(iv) मुलाचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेणाऱ्या (4) रुक्मिणीबाई

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे - (२)

(य) ______

(र) ______

           मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री, पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड, शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे. अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र! बाकीची जाग-जाण मिटलेली असायची. अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवलेली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले त्यामागे या मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्त्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या, तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय काय दडलं असेल! त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं, समुद्राशी माझा संवाद चालायचा.

- गिरिजा किर

(२) ‘पाण्यावर सांडलेलं चांदण पाहिलं’ की लेखिकेची होणारी भावावस्था - (२)

(य) ______

(र) ______


खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

         अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला.

माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताऱ्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा.


कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.


ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विविध ॲप्स कोणते? त्यांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती मिळवा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. आकृतिबंध पूर्ण करा:      (2)

मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वत:च्या लेकरांसाठी ती ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले - खुपले, की ती कावरी - बावरी होते. आई ! ह्या दोन अक्षरांत साऱ्या श्रृतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल.

2. कधी ते लिहा:    (2)

  1.  आई कावरीबावरी होते - ______
  2. आई थकणार नाही - ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×