Advertisements
Advertisements
प्रश्न
चित्र पाहा. संवाद वाचा.
आई: | अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग? |
जाॅर्डन: | आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं? |
आई: | मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत. त्यांचा पुरेपूर वापर करावा. |
जाॅर्डन: | अगं हो, पण आता काय करू ते सांग ना! |
आई: | यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत, ते बाजूला कर. जे तुझ्या अंगाला येत नाहीत, जे फाटले आहेत ते वेगळे वेगळे कर. |
जाॅर्डन: | आई, आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का? |
आई: | हो, नक्कीच. त्यासाठी आपल्यात फक्त कलात्मकता पाहिजे. |
जाॅर्डन: | आई, काय काय बनवता येईल गं या कपड्यांचं? |
आई: | तुला सुट्टी आहे ना आज, चल आपण दोघं मिळून बनवूया. (आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते.) |
जाॅर्डन: | आई, किती छान झाल्यात गं या वस्तू. खूपच छान दिसत आहेत. खरंच, आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. |
आपल्याला लहान झालेले, पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता?
लघु उत्तर
उत्तर
कपडे लहान झाले, की माझी आई ते कपडे स्वच्छ धुवून वाळवते व त्या कपड्यांना इस्त्री करून ते कपडे अनाथालयातील मुलांना देते किंवा आमच्याकडे घरकाम करणाऱ्या मावशीच्या मुलांना देते.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?